Wednesday 18 November 2015

सुपारी काढुन जेव्हा दाखवली

सुपारी काढुन जेव्हा दाखवली
तेव्हा
बुचकाळ्यात पडुन तिनं
आवंढा गिळला
मी म्हटलं दालचिनी हायका?
त्यावर शुन्यात नजर लावुन ती म्हणाली
सगळच पेटलयं
अगदी काताचाही बुकणा झालाय
आता चंचीत हात घालुन
वेलदोडा बोटाच्या चिमटीत घ्यायचा प्रयत्न करतोय
पण मधल्या बोटाला लागलेला चुना म्हणाला
शेंबडीच्या, कधीपासुन चिवडतोय?
घे की पानावर
होऊन जाऊदे एक खुल्ला बार
ती कानात कुजबुजली
पावसाळा पेटवतोस का?
एक कडाडती वीज फुकटात देईन तुला
फक्त बोटांनी पिचकाऱ्या मारणं थांबव
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments:

Post a Comment